गूगल कारनंतर आता अॅपल कार येतेय!

अॅपलचा मोबाईल आपल्या खिशात असने प्रतिष्ठेचे मानले जाते. मोबाईलमध्ये आघाडी घेतल्यानंतर अॅपलची इलेक्ट्रिकवर चालणारी 'टायटन' कार लवकरच बाजारात येतेय. गूगल कारनंतर ही कार असेल. ही कार म्हणजे एकप्रकारे सॉफ्टवेअर गेमच असेल. मात्र, ही कार लगेच तुम्हाला बुक करता येणार नाही.

Updated: Feb 16, 2015, 09:05 AM IST
गूगल कारनंतर आता अॅपल कार येतेय! title=

न्यूयॉर्क : अॅपलचा मोबाईल आपल्या खिशात असने प्रतिष्ठेचे मानले जाते. मोबाईलमध्ये आघाडी घेतल्यानंतर अॅपलची इलेक्ट्रिकवर चालणारी 'टायटन' कार लवकरच बाजारात येतेय. गूगल कारनंतर ही कार असेल. ही कार म्हणजे एकप्रकारे सॉफ्टवेअर गेमच असेल. मात्र, ही कार लगेच तुम्हाला बुक करता येणार नाही.

अॅपलने या प्रकल्पासाठी खास कार डिझायनर्स आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील तज्ज्ञ कामाला लावले आहेत. अनेकांना अॅपलच्या कारची प्रतीक्षा आहे. अॅपल मात्र, अत्यंत सावधपणे या प्रकल्पाबाबत पावले उचलत आहे.

दरम्यान, ‘गूगल’नं कार तयार केलीय.स्वयंचलित ही कार असणार आहे. इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ‘गूगल’नं सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवण्यात यश मिळवलंय. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमनं आपलं हे यश सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या ग्राहकांशी शेअर केलंय. 

येत्या काही दिवसांत या कारचं परीक्षण पार पडेल आणि नवीन वर्षात उत्तर कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर ही कार पाहायला मिळेल, अशी आशा या टीमनं व्यक्त केलीय. बिना स्टिअरिंग ही कार स्वयंचलित पद्धतीनं रस्त्यावर दिसेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.