गूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह

गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.

Updated: Sep 30, 2015, 11:24 AM IST
गूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह  title=

कोटा, राजस्थान: गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.

आणखी वाचा - New Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल

मुंबईत राहतात ओलाराम

माधुरी शर्मा एका सैन्यातील जवानाच्या विधवा आहेत. दोघांनी आर्य समाजाच्या रितीप्रमाणे विवाह केला. कोटाच्या सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर ओलाराम मुंबईत राहतात.

मुलं-मुली परदेशात

ओलाराम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघंही परदेशात राहतात. त्यांची मुलगी अंजली गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पत्नी आहेत. ओलाराम यांनी विवाहानंतर सांगितलं की, 'प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा आणि आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.'

आणखी वाचा - भारतीय वंशांचे सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.