लवकरच गुगल इंटरनेचा स्पीड १०० पटीने वाढवणार

ही बातमी देशभरातील ३ अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही इंटरनेटवरून गाणी, व्हिडीओ, फोटोज अपलोड करतात तेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ वाया घालवावा लागतो.

Updated: Jan 31, 2015, 10:00 PM IST
लवकरच गुगल इंटरनेचा स्पीड १०० पटीने वाढवणार title=

न्यूयॉर्क : ही बातमी देशभरातील ३ अब्ज इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही इंटरनेटवरून गाणी, व्हिडीओ, फोटोज अपलोड करतात तेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ वाया घालवावा लागतो, मात्र इंटरनेटचा स्पीड वाढल्यानंतर ३ सेकंदात तुम्हाला १०० व्हिडीओ, १०० फोटोज आणि एक व्हिडीओ गेम डाऊन लोड होऊ शकणार आहे. ७ सेंकदात संपूर्ण एक एचडी फिल्म डाऊनलोड होऊ शकणार आहे.

गुगल असं सुपरफास्ट इंटरनेट आणणार आहे, ज्याच्या वेगाचा सामना कुणीही करू शकणार नाही. ज्या गोष्टीचा विचार कराल आणि माऊसचा एक टीक कराल, ती वस्तू तुमच्यासमोर असेल.

गुगल फायबर नावाच्या या इंटरनेट कनेक्शनला १ हजार एमबीपीएस  प्रति सेंकंदाचा स्पीड असेल, आणि हा स्पीड सध्याच्या ब्रॉडबँण्डपेक्षा १०० पटीने अधिक आहे. १०० फोटोंना डाऊनलोड करण्यासाठी सध्या ४ मिनिटं आणि ४० सेकंद लागतात, मात्र गुगल फायबरवर हे काम फक्त ३ सेकंदात होणार आहे.

एक एचडी सिनेमा डाऊनलोड करण्यासाठी सध्या ११ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो, मात्र गुगल फायबरने हे काम फक्त ७ सेकंदात होणार आहे. गुगलने अमेरिकेच्या महत्वाच्या तीन शहरांमध्ये सध्या गुगलचं फायबरची सेवा सुरू केली आहे, पुढील पाच शहरात ती लवकरच सुरू होणार आहे, भारतातही ही सेवा लवकरच सुरू करण्याचा गुगलचा मानस आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.