गूगलकडून सुरक्षित वेबसाईटसना मानाचं स्थान

Last Updated: Thursday, August 7, 2014 - 20:56
गूगलकडून सुरक्षित वेबसाईटसना मानाचं स्थान

मुंबई : गूगलने दिलेल्या माहितीनुसार गूगल आता आपल्या सर्च पेजवर सर्वात ज्यास्त सुरक्षित वेबसाईटच्या पानांना प्राधान्य देणार आहे.

गूगल सर्चमध्ये एचटीटीपीएस ( https://) इन्क्रिप्शनची वेबची पानं हायलाईट केली जाणार आहेत, हायलायइट झालेली पेजेस सुरक्षित आहेत, असा त्याचा अर्थ असेल.

कारण बँकिंग आणि इतर महत्वाच्या साईटस, ज्यांना हॅकरपासून धोका असतो, त्या साईट नेहमी एचटीटीपीएस वापरतात, आपणही एचटीटीपीएस वर नजर टाकून ऑनलाईन बँकिंगचा व्यवहार केला आहे. 'एचटीटीपी' नंतर येणार 'एस' म्हणजे सुरक्षित असा, त्याचा अर्थ होतो.

गूगलने सांगितलंय की, एचटीटीपीएसला सकारात्मक प्रतिसाद असल्याने या पेजेसना आता वरचं रँकिंग दिलं जाणार आहे.

गुगलच्या या निर्णयानंतर जास्तचं जास्त वेबसाईट या http:// वरून https:// वर येतील आणि हॅकर्सचा धोका फार कमी होणार आहे. इनस्क्रिप्शनने वेबसाईट सुरक्षित होते, मात्र अशी साईट उघडण्यास वेळ लागतो.

मात्र आता हाय स्पीड इनक्रिप्शन तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे, यामुळे खर्च आणि स्पीडची चिंता नसेल असं तज्ञांनी म्हटलंय.जीमेलने 2011 पासून एचटीटीपीएस लागू केलं होतं, तर फेसबुकने जुलै 2013 पासून तर याहूने मार्च 2014 पासून इनस्किप्शन वापरण्यास सुरूवात केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 7, 2014 - 20:56
comments powered by Disqus