गुड न्यूज: गूगलनं अवघ्या १२,९९९ किंमतीचे दोन लॅपटॉप केले लॉन्च

भारतीय गॅजेट बाजारातील मागणी पाहता गूगलनं दोन स्वस्त क्रोमबूक लॅपटॉप लॉन्च केले आहेत. दोन्ही लॅपटॉप गूगलच्या क्रोम लेटेस्ट व्हर्जन ऑपरेटिंग सिस्टमचे आहेत. दोघांचीही किंमत गूगलनं फक्त १२,९९९ रुपये ठेवली आहे. 

Updated: May 16, 2015, 07:49 PM IST
गुड न्यूज: गूगलनं अवघ्या १२,९९९ किंमतीचे दोन लॅपटॉप केले लॉन्च title=

मुंबई: भारतीय गॅजेट बाजारातील मागणी पाहता गूगलनं दोन स्वस्त क्रोमबूक लॅपटॉप लॉन्च केले आहेत. दोन्ही लॅपटॉप गूगलच्या क्रोम लेटेस्ट व्हर्जन ऑपरेटिंग सिस्टमचे आहेत. दोघांचीही किंमत गूगलनं फक्त १२,९९९ रुपये ठेवली आहे. 

'द कम्यूटर फॉर एव्हरी वन' या टॅग लाईनसह गूगलनं या लॅपटॉपना बाजारात उतरवलं आहे. दोन्ही लॅपटॉप 'स्नॅपडील' आणि 'अॅमेझॉन' या साईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दोघांचेही फीचर जवळपास एकसारखे आहेत. 

११.६ इंच स्क्रिन साइज -
दोन्ही लॅपटॉपना  ११.६ इंच टीएफटी स्क्रिन देण्यात आली आहे. नेक्सिअर डिस्प्ले १३६६x७६९ पिक्सेल आहे. 

ऑपरेटिंग सिस्टम-
दोन्ही लॅपटॉपमध्ये गूगल क्रोम लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. 

बॅटरी-
४२०० mAhची बटरी दोघांनाही देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी-
क्रोमबूकमध्ये ब्लुटूथ ४.० HDMI पोर्ट, दोन USB २.० देण्यात आला आहे. व्हिडिओ चॅटसाठी १ मेगापिक्सल वेब कॅमेरा देण्यात आला आहे. 

प्रोसेकर आणि रॅम-
१.८ GHz कॉर्टेक्स A17 रॉकचिप क्वॉड कोर प्रोसेसर आणि २ जीबी DDR3 रॅम देण्यात आला आहे. 

यूजरसाठी एक कमतरता यात असणार आहे. यात हार्डड्राइव्ह नसणार आहे. तुम्हाल स्टोरेजसाठी क्लाउड किंवा एक्सटर्नल हार्डड्राईव्हवर अवलंबून रहावं लागणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.