गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर लॉलीपॉप व्हर्जन

गुगलने लॉलीपॉपचं अखेर लॉन्चिंग केलं आहे. गूगलची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईडचं किटकॅट नंतरचं हे पुढचं व्हर्जन आहे. या व्हर्जनला 5.0 'लॉलीपॉप' असं नाव देण्यात आलं. अँड्रॉईडचं सर्वात आधी आलेलं व्हर्जन होतं, फ्रोझन योगर्ट तेव्हा ते भारतात एवढं नावारूपाला आणि वापरात नव्हतं, अँड्रॉईडचे आतापर्यंत आलेली व्हर्जन, आणि त्यांना देण्यात आलेलं नाव हे लहान मुलांचा खाऊवरून असतात.

Updated: Oct 16, 2014, 10:55 PM IST
गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर लॉलीपॉप व्हर्जन title=

मुंबई : गुगलने लॉलीपॉपचं अखेर लॉन्चिंग केलं आहे. गूगलची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईडचं किटकॅट नंतरचं हे पुढचं व्हर्जन आहे. या व्हर्जनला 5.0 'लॉलीपॉप' असं नाव देण्यात आलं. अँड्रॉईडचं सर्वात आधी आलेलं व्हर्जन होतं, फ्रोझन योगर्ट तेव्हा ते भारतात एवढं नावारूपाला आणि वापरात नव्हतं, अँड्रॉईडचे आतापर्यंत आलेली व्हर्जन, आणि त्यांना देण्यात आलेलं नाव हे लहान मुलांचा खाऊवरून असतात.

सर्वात आधी आलं १) फ्रोझन योगर्ट, त्याला फ्रोयो देखिल म्हणायचे, यानंतर आलं २) जिंजरब्रेड, लगेच ३) हनीकॉम्ब, मग ४) आईस्क्रीम सँडवीच येथेच न थांबता त्यानंतर, ५) जेली बीन, आणखी ६) किटकॅट आणि आता लॉलीपॉप दाखल झालंय.

लॉक नोटिफिकेशन

अँड्रॉईड 5.0 लॉलीपॉपमध्ये युझर्स त्यांचे नोटिफिकेशन्स लॉक स्क्रीनसह मर्ज करु शकतात. तसेच अनलॉक न करताही नोटिफिकेशन चेक करु शकतात, तसंच रिप्लाय करु शकतात.

न्यू ले-आउट

अँडॉईडच्या नव्या व्हर्जनमध्ये पेजसारखं मल्टी-टास्क विंडो दिसतील. युझर्स या विंडो स्वाईप करुन खाली करु शकतात. तसंच सुरु असलेली विंडोला टॅप करुन वर करु शकतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.