<b><font color= #888066> भारत सरकारच्या कामगार विभागामध्ये भरती</font></b>

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार विभागमध्ये सात महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तपासणीस कामगार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 30, 2013, 12:28 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, चंदीगड
भारत सरकारच्याकामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार विभागमध्ये सात महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तपासणीस कामगार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील विविध जिल्ह्यांत घरोघरी फिरून रोजगार-बेरोजगार सर्वेक्षाशी संबंधीत माहिती सकंलनाचे काम कंत्राटी तपासणीसांनी करावयाचे आहे. त्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहे. एकरकमी १६,००० दरमहा मानधन आणि टीए,डीए अतिरिक्त दिला जाणार आहे.
आपले अर्ज दि. ३० ऑक्टोबर २०१३पासून दहा दिवसांच्या आत अर्ज पाठवायचे आहेत. कामगार विभाग, चंदीगड यामध्ये कंत्राटी तपासणीस पदासाठी अर्ज असे लिहावे. आपला अर्ज स्पीड पोस्टाने महासंचालक, कामगार विभाग, कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, एससीओ : २८-३१, सेक्टर १७ ए, चंदीगड येथे पाठवियाचे आहेत.
तुमची निवड झाल्याची माहिती www.labourbureau.nic.in
या संकेस्थळावर पाहायला मिळेल.
पाहा जाहिरात

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close