५०० रुपयाचं मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांनो सावधान !

नोटबंदीमुळे सामान्यांना थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचं स्वागत होतोय. सरकारने काही ठिकाणी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या ५०० च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाईल रिचार्ज वाउचर खरेदी करत आहे. पण असं वाटत असेल की यावर कोणाचं लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचं सरळ लक्ष आहे.

Updated: Nov 26, 2016, 04:26 PM IST
५०० रुपयाचं मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांनो सावधान ! title=

मुंबई : नोटबंदीमुळे सामान्यांना थोडा त्रास होत असला तरी अनेकांकडून या निर्णयाचं स्वागत होतोय. सरकारने काही ठिकाणी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यास सूट दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येणार आहेत. याचा फायदा घेत अनेक जण जुन्या ५०० च्या नोटा घेऊन प्रीपेड मोबाईल रिचार्ज वाउचर खरेदी करत आहे. पण असं वाटत असेल की यावर कोणाचं लक्ष नाही पण सावधान, यावर सरकारचं सरळ लक्ष आहे.

सरकारने रिटेलरला अशा लोकांची माहिती देण्यास सांगितली आहे जे ५०० चे रिचार्ज करत आहेत. देशात एकूण ९० टक्के लोकं प्रिपेड सेवा वापरतात. त्यामुळे जर अशा माध्यमातून कोणी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकार अशा मोबाईलनंबरवर सरळ लक्ष ठेवून आहेत.