अमेझ : होंडाची डिझेल कार अवतरली!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, April 11, 2013 - 14:26

www.24taas.com, नवी दिल्ली
होंडाच्या डिझेल कारची अनेक जणांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आज संपलीय. ‘अमेझ’या नावानं होंडानं ही हॅचबॅक सेडान कार लॉन्च केलीय. या कारची किंमत सुरू होतेय ४.९९ लाख रुपयांपासून.
ग्राहकांना ही कार सहा वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, कारची इंजिन क्षमता १०० पीएस (९८-९९बीएचपी) आणि २५.८ किमी प्रति लीटर असेल. अमेझमध्ये १.५ लीटर आय-डीटेक डिझेल इंजिन आहे. मारुती स्विफ्टला टक्कर देण्यासाठी होंडानं अमेझ बाजारात आणलीय.
पेट्रोल वर्जन कारची किंमत
‘ई’ ग्रेडची किंमत – ४.९९ लाख रुपये
‘ईएक्स’ ग्रेडची किंमत – ५.२४ लाख रुपये
‘एस’ग्रेडची किंमत – ५.६२ लाख रुपये
‘व्हिएस’ ग्रेडची किंमत – ६.६० लाख रुपये
‘सॅट’ ग्रेडची किंमत – ६.६२ लाख रुपये
‘व्हीएक्सएटी’ग्रेडची किंमत – ७.५० लाख रुपये

डीजल वर्जनची किंमत
‘ई’ ग्रेडची किंमत – ५.९९ लाख रुपये
‘ईएक्स’ ग्रेड ची किंमत – ६.२४ लाख रुपये
‘एस’ग्रेड ची किंमत – ६.६७ लाख रुपये
‘व्हिएस’ ग्रेड ची किंमत – ७.६० लाख रुपये

First Published: Thursday, April 11, 2013 - 14:21
comments powered by Disqus