पोकेमॉन गो खाणार तुमचा एवढा इंटरनेट डेटा

पोकेमॉन गो या गेमनं स्मार्टफोन विश्वामध्ये धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे तरुणाईला वेड लागलं आहे. 

Updated: Jul 22, 2016, 08:43 PM IST
पोकेमॉन गो खाणार तुमचा एवढा इंटरनेट डेटा title=

मुंबई : पोकेमॉन गो या गेमनं स्मार्टफोन विश्वामध्ये धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे तरुणाईला वेड लागलं आहे. भारतामध्ये हा गेम लॉन्च झाला नसला तरी अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये या गेमचं पायरेटेड व्हर्जन आहे. 

पोकेमॉन गोमध्ये तुम्हाला वास्तवातल्या जगात फिरून पोकेमॉनला पकडायचं असतं. या गेममध्ये अनेक लेव्हल आहेत. या लेव्हल पार करताना मजेशीर अनुभव येतात. 

जेव्हा तुम्ही वास्तवातल्या जगात बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला GPSवर पोकेमॉनच्या दिशेचा अंदाज मिळतो. तुम्ही जितके जास्त पोकेमॉन जमवाल, तेवढे या गेममध्ये पुढे जाता.

हा गेम खेळण्यासाठी किती इंटरनेट डेटा लागतो हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला असेल. याबाबतही आता सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दिवसभरात तुम्ही आठ तास पोकेमॉन गो खेळलात तर तुमचा 25 MB इंटरनेट डेटा वापरला जाईल. दररोज तुम्ही हा गेम आठ तास खेळलात तर तुम्हाला महिन्याला 775 MB डेटा वापरला जाईल. 

इंटरनेट डेटाबरोबरच GPS च्या वापरामुळे मोबाईल बॅटरीची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकेल. त्यामुळे पोकेमॉन गो खेळताना पोर्टेबल बॅटरी घेण्यासाठीही तुम्हाला खर्च करावा लागू शकतो.