'एचटीसी डिझायर 526+' भारतात लॉन्च...

'एचटीसी'नं भारतात आपल्या डिझायर सीरिजमधला तीसरा फोन या महिन्यात लॉन्च केलाय. या फोनचं नाव आहे 'एचटीसी डिझायर 526+'...

Updated: Jan 29, 2015, 04:03 PM IST
'एचटीसी डिझायर 526+' भारतात लॉन्च... title=

मुंबई : 'एचटीसी'नं भारतात आपल्या डिझायर सीरिजमधला तीसरा फोन या महिन्यात लॉन्च केलाय. या फोनचं नाव आहे 'एचटीसी डिझायर 526+'...
 
ऑक्टा कोअर प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये मल्टिटास्किंगसाठी 1 जीबी रॅम उपलब्ध करून देण्यात आलीय. 'एचटीसी डिझायर 526+' हा फोन 8 जीबी आणि 16 जीबी अशा दोन प्रकरांत उपलब्ध आहे. 

'एचटीसी डिझायर 526+' हा एक ड्युएल सिम स्मार्टफोन आहे. यामध्ये, ड्युएल स्टँडबाय फिचर आहे. याचाच अर्थ, एका सिमवर कॉल आला असेल तर दुसरा सिम 'आऊट ऑफ कव्हरेज' दाखवला जाईल. 

या फोनमध्ये अँन्ड्रॉईड किटकॅट 4.4 ऑपरेटींग सिस्टम आहे. तसंच यामध्ये युझर इंटरफेसमध्ये एचटीसीचा 'सेन्स यूझर इन्टरफेस' दिला गेलाय. 

8 जीबीसाठी ग्राहकांना 10,400 रुपये तर 16 जीबीसाठी 11,400 रुपये मोजावे लागतील. हा फोन सुरुवातीला केवळ स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध होईल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हा फोन विक्रिसाठी उपलब्ध होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.