आयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात

आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.

Updated: Jul 15, 2016, 09:41 PM IST
आयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात title=

मुंबई : आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे. देशभरात शुक्रवारपासून ही ऑफर लागू झाली आहे. 
आयडियाच्या 1GB पेक्षा कमी डेटा पॅकवर 45 टक्के जास्त डेटा मिळणार आहे. आयडिया 225 रुपयांमध्ये 4G, 3G, 2G डेटा पॅकची सुविधा देते. 

आयडियाच्या 19 रुपयांच्या कुपनवर तीन दिवसांसाठी 75 MB 2G डेटा मिळत होता. नव्या दरांमुळे आता 110 MB डेटा मिळणार आहे. हीच सुविधा 3G आणि 4G डेटा पॅकवरही मिळणार आहे. 22 रुपयांचा डेटा पॅक विकत घेतल्यानंतर आधी तीन दिवसांसाठी 65 MB डेटा मिळायचा आथा 90 MB डेटा मिळणार आहे.