खरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्याला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर

महिन्याभरापूर्वी झालेल्या फायनल प्लेसमेंटमध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांसमोर प्रीप्लेसमेंट ऑफरचा पाऊस पडला आहे, हा वेळी या ऑफर 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Updated: Nov 6, 2014, 05:34 PM IST
खरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्याला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर title=

कोलकाता : महिन्याभरापूर्वी झालेल्या फायनल प्लेसमेंटमध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांसमोर प्रीप्लेसमेंट ऑफरचा पाऊस पडला आहे, हा वेळी या ऑफर 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 125 विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफरमधून फायनल जॉब ऑफर मिळाल्या आहेत. मागील बॅचपेक्षा ही संख्या 20 टक्के अधिक आहे. यातील एकाला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

यावेळी ई-कॉमर्सशी संबंधित कंपन्यांशी जास्त प्लेसमेंट होत असल्याचं दिसून आलं आहे, यात जागतिक स्तरावरील गुगलचं हेड क्वार्टर माऊटन व्ह्यूव्ह येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. फेसबुक, वर्क अॅप्लिकेशन स्क्रम्बलरकडूनही ऑफर आहेत.

आणखी काही फायनल प्लेसमेंटला डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार आहेत. डिसेंबरपर्यंत या ऑफर्समध्ये 50 टक्के वाढ होण्याचा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.