भारत इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये नेपाळ, बांगलादेशपेक्षाही मागे

एकीकडे देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत बोलले जात असताना दुसरीकडे मात्र इंटरनेटवरुन डाऊनलोड स्पीडमध्ये भारत शेजारीत देश नेपाळ आणि बांगलादेशाहूनही मागे आहे.

Updated: Dec 23, 2016, 04:07 PM IST
भारत इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये नेपाळ, बांगलादेशपेक्षाही मागे title=

नवी दिल्ली : एकीकडे देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेबाबत बोलले जात असताना दुसरीकडे मात्र इंटरनेटवरुन डाऊनलोड स्पीडमध्ये भारत शेजारीत देश नेपाळ आणि बांगलादेशाहूनही मागे आहे.

इंटरनेटवरुन डाऊनलोडच्या स्पीडमध्ये भारत 96व्या स्थानी आहे. तर एकूण बँडविड्थमध्ये भारत 105व्या स्थानी आहे. इतकंच नव्हे तर इंटरनेट सुरक्षा प्रकरणातही भारत पिछाडीवर आहे.

देशातील वाढत्या सायबर क्राईमच्या घटना पाहता अनेक जण ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य देत नाहीत. त्यांच्या मते अशा व्यवहारांमुळे त्यांचा व्यक्तिगत डेटा चोरीला जाऊ शकतो. 

एकीकडे सरकार देशात कॅशलेस अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर भर देत असताना सायबर सुरक्षेचे आश्वासन देणेही तितकेच गरजेचे आहे. सायबर क्राईममध्ये भारत जगात सहाव्या स्थानी आहे. गेल्या एका वर्षात या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झालीये.