एक अॅप/वेबसाईट बनवा आणि जिंका 1.52 करोड रुपयांचं बक्षीस

‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ (Internet.org) प्रोजेक्टमध्ये Internet.org इनोव्हेशन चॅलेंजची सुरुवात करण्यात आलीय. या चॅलेंजनुसार, इंटरनेटला महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि मजुरांपर्यंत पोहचवणाऱ्यांना नवी ओळख दिली जाणार आहे. 

Updated: Oct 10, 2014, 04:46 PM IST
एक अॅप/वेबसाईट बनवा आणि जिंका 1.52 करोड रुपयांचं बक्षीस title=

नवी दिल्ली : ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ (Internet.org) प्रोजेक्टमध्ये Internet.org इनोव्हेशन चॅलेंजची सुरुवात करण्यात आलीय. या चॅलेंजनुसार, इंटरनेटला महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि मजुरांपर्यंत पोहचवणाऱ्यांना नवी ओळख दिली जाणार आहे. 

नवीन अॅप्लिकेशन, वेबसाईट आणि ऑनलाईन सर्व्हिस डेव्हलप करण्यासाठी आणि लोकांना प्रोत्साहित करणं, हे या इंटरनेट चॅलेंजचं लक्ष्य आहे.

1.52 करोड रुपयांचं बक्षीस
या चॅलेंजमध्ये तुम्ही वेबसाईट, ऑनलाईन सर्व्हिस किंवा अॅप्लिकेशन बनवलं असेल आणि त्याची निवड करण्यात आली तर तुम्हाला 250,000 डॉलरचं (1.52 करोड रुपये) बक्षीस देण्यात येईल. इतकंच नाही तर तुम्हाला फेसबुककडून Fbstart प्रोग्रामद्वारे 60,000 डॉलरचं पॅकेजही दिलं जाईल.

काय असावं तुमच्या प्रयोगात?
तुम्ही डेव्हलप केलेलं एखादं अॅप, वेबसाईट किंवा ऑनलाईन सर्व्हिस चार कॅटेगिरीवर जज केली जाईल. या कॅटेगिरी आहेत महिला, विद्यार्थी किंवा मजूर... या वर्गातील लोकांसाठी तुमचा प्रयोग किती फायदेशीर ठरतो, याचं मोजमाप या चॅलेंजमध्ये केलं जाईल. 


Internet.org 

कसं व्हाल सहभागी
नाव : जो अॅप किंवा वेबसाईट डेव्हलप करत असेल त्याचं संपूर्ण नाव, मेल अॅड्रेस, फोन नंबर, ग्रुप, ऑर्गनायझेशनचं नाव तसंच तुम्ही ग्रुपमध्ये काम करत असाल तर प्रत्येक ग्रुप मेंबरचा फोन नंबर द्या.   

प्रोजेक्टची संपूर्ण माहिती : टीमचं बॅग्राऊंड, प्रोजेक्टचा उद्देश, कुणासाठी हे अॅप्लिकेशन किंवा वेबसाईट आहे आणि भाषा यांची संपूर्ण माहिती असावी. आपल्या प्रोजेक्टचा स्क्रीन शॉट इमेजही तुम्ही यासाठी पाठवू शकता.

प्रोजेक्ट डिटेल : प्रोजेक्ट डिटेल 2000 शब्दांपेक्षा जास्त नको...

मेल / लिंक : तुमच्या मेल बॉडीमध्ये ही सगळी माहिती लिहून किंवा लिंक बनवूनही तुम्ही ही माहिती पाठवू शकता.

अॅप इन्स्टॉलेशन : अॅप इन्स्टॉलेशन आणि यूझर फाईलला एका अटॅचमेंट फाइलमधून तुम्हाला पाठवता येईल... सोबतच ते कसं इन्स्टॉल करायचं त्याची माहितीही तुम्हाला द्यावी लागेल. 

व्हिडिओ : तुम्ही तुमचा प्रोजेक्ट व्हिडिओ फाईल बनवूनही सादर करू शकता. हा व्हिडिओ 5 मिनिटांपेक्षा जास्त मोठा नसावा... आणि या व्हिडिओची लिंकही सोबत जोडलेली असावी. 

माहिती कुठे पाठवाल?
ही सगळी माहिती तुम्ही challengerules@internet.org या ई-मेलवर पाठवाल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.