आयफोन 7 भारतात लॉन्च होणार

आता अॅपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी. बहुप्रतीक्षित आयफोन सेव्हन येत्या 7 तारखेला लॉन्च होणार आहे. 

Updated: Aug 30, 2016, 11:08 AM IST
आयफोन 7 भारतात लॉन्च होणार title=

मुंबई : आता अॅपल प्रेमींसाठी आनंदाची बातमी. बहुप्रतीक्षित आयफोन सेव्हन येत्या 7 तारखेला लॉन्च होणार आहे. 

आयफोन 7 हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन असेल अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे स्मार्टफोन्समध्ये असणाऱ्या प्रचलित ऑडिओ जॅकचं सॉकेटही बदलण्यात येणार आहे. 

आयफोन त्याच्या उत्तम साऊंड आऊटपुटसाठी प्रसिद्ध आहे. त्यात आणखी सुधारणा व्हावी यासाठी नवा पर्याय आता आयफोन सेव्हनमध्ये उपलब्ध होणार आहे. यासोबत अॅपल वॉच टू सुद्धा लॉन्च होणार आहे.