मुलगा आणि एका मुलीत कधी मैत्री होऊ शकते का?

एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. आपण पाहत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये हा डायलॉग ऐकायला मिळतो. आता या मैत्रीची समस्या विज्ञान सोडवणार आहे. अमेरिकेच्या 'यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन'मध्ये या विषयावर संशोधन करण्यात आलं.

Updated: Sep 14, 2016, 05:29 PM IST
मुलगा आणि एका मुलीत कधी मैत्री होऊ शकते का? title=

मुंबई: एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. आपण पाहत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये हा डायलॉग ऐकायला मिळतो. आता या मैत्रीची समस्या विज्ञान सोडवणार आहे. अमेरिकेच्या 'यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन'मध्ये या विषयावर संशोधन करण्यात आलं.

या सर्वेक्षणात 88 मित्र-मैत्रीणींना त्यांच्या भावनांच्या आधारावर प्रश्न विचारण्यात आले. या शोधात जास्त मुली आपल्या पुरूष मित्राबरोबर मैत्रीची भावना ठेवत असल्याचं समोर आलं आहे. त्या मित्रामध्ये मुलगी एक चांगला मित्र शोधत असते. याउलट पुरूषांचे विचार पूर्णपणे वेगळे असतात. जास्त पुरुषांनी आपल्या महिला मैत्रीणीविषयी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. महिलांच्या विचारांपुढे मैत्रीची वेगळी भावना पुरुषांमध्ये पाहायला मिळाली.

एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही, या विषयावर महिला आणि पुरुषांचे विचार वेगळे असल्याचं दिसून आलं.