नोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी  हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Updated: Jan 8, 2015, 09:57 PM IST
नोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती title=

मुंबई : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी  हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

# 'निरी', नागपूर वरिष्ठ वैज्ञानिक ९ जागांसाठी भरती
सीएसआयआर - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), नागपूर येथे वरिष्ठ वैज्ञानिक, वैज्ञानिक (९ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०१५ असून अधिक माहिती www.neeri.res.in या संकेतस्थळ मिळेल.

# बॅंक ऑफ महाराष्ट्र १ जागा
बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे येथील मुख्य कार्यालयात व्यवस्थापक श्रेणी २, वरिष्ठ व्यवस्थापक श्रेणी ३ मध्ये कंपनी सेक्रटरी (१ जागा)पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारी १० जानेवारी २०१५ असून www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर मिळेल.

# इंडियन आर्मी हवालदार पदाच्या ४३७ जागा
भारतीय सैन्य दलामध्ये हवालदार - शैक्षणिक (४३७ जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०१५ आहे. अधिक माहिती indianarmy.nic.in या संकेतस्थळावर मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.