नोकरीची सुवर्णसंधी, ३२७ जागांसाठी भरती

तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३२७ जागांसाठी भरती कऱण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे आताच तु्म्ही अर्ज करा.

Updated: Dec 19, 2014, 03:58 PM IST
नोकरीची सुवर्णसंधी, ३२७ जागांसाठी भरती title=

मुंबई : तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३२७ जागांसाठी भरती कऱण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे आताच तु्म्ही अर्ज करा.

आयुध कारखाना, खडकी. पुणे-गट 'क' संवर्गातील २७३ जागा
आयुध कारखाना बोर्ड, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे येथे गट  'क' संवर्गातील सीपीडब्ल्यू (५३ जागा), परीक्षक (३८), डीबीडब्ल्यू (११०), बॉयलर सेवक (१ ), सुतार (७), इलेक्ट्रिशियन (१), फिटर (३५), फिटर पाईप (८), मशिनिस्ट (१), गवंडी (१३), पेंटर (५), टर्नर (१) या पदासांठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०१४ आहे.
अधिक माहिती  https://afk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

BELमध्ये विविध पदांच्या ३ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये उपव्यवस्थापक (१ जागा), कनिष्ठ अभियंता (१), उपअभियंता (१), या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०१४ आहे. अधिक माहितीसाठी https://www.bel-india.com  या संकेतस्थळावर लॉगऑन करा.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण ५१ जागा
राष्ट्रीय हरित प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत विभागीय कार्यालय  भोपाळ, चेन्नई, पुणे आणि कोलकाता येथे खासगी सचिव (११),  सहाय्यक-न्यायालयीन (५), ग्रंथपाल (५),  लघुलेखक (६), शिपाई/सेवक (२४) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०१४ आहे. अधिक माहितीसाठी www.greentribunal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.