लक्ष द्या: भारतात 'मोटो-G' घ्यायची शेवटची संधी!

Last Updated: Friday, August 22, 2014 - 18:13
लक्ष द्या: भारतात 'मोटो-G' घ्यायची शेवटची संधी!

मुंबई:  स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात आणि तोही मोटोरोलाचा मोटो-जी तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. कारण 'मोटो-जी' चा शेवटचा स्टॉक फ्लिपकार्टनं मार्केटमध्ये उतरवला असून यानंतर भारतात 'मोटो जी'ची विक्री बंद होणार आहे.

फ्लिपकार्ट वेबसाईटवर,  'मोटो जी'चा शेवटचा स्टॉक' संपण्यापूर्वी बुक करा.’  अशी जाहीरात टाकण्यात आली आहे. 'मोटो जी'चे ८ जीबीच्या मॉडेलचा स्टॉक अगोदरच संपला असून फक्त १६ जीबीचे मॉडेल सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

भारतात मोटोरोला 'मोटो जी'चं पुढील व्हर्जन ५ सप्टेंबरला लॉन्च होणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा केली आहे. भारतात 'मोटो जी'च्या पहिल्याच मॉडेलची मोठ्या प्रमानात विक्री झाल्यानं मोटोरोलानं भारतीय मोबाईल बाजारपेठेत चांगलंच वर्चस्व मिळवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन कंपन्याचे स्मार्टफोन भारतीय बाजारात आले आहे. त्यामुळं मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन जरी बाजारात उतरवत असला तरी त्याच्या पुढे तगडं आव्हान असणार आहे.

भारतात सध्या जास्त मागणी असलेल्या आसुसचा जेनफोन फाइव्ह आणि चीनच्या जिओमीच्या एमआय थ्रीने मोटोरोलाच्या स्मार्टफोनला चांगलीच टक्कर दिली आहे. त्यामुळे मोटोरोलाला 'मोटो जी'ची किंमत देखील कमी करावी लागली.

जिओमीमी थ्रीला आव्हान देण्यासाठी मोटोरोला आता नवीन स्मार्टफोन ५ सप्टेंबरला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

ल़ॉन्च होणाऱ्या मोटोरोलाच्या नवीन 'मोटो जी-2'ची वैशिष्टे

स्क्रीनः ७२० पिक्सल्स रेझोल्यूशनची ५ इंच डिस्प्ले

प्रोसेसरः १.२ गीगाहर्त्ज क्वॉड-कोअर कोर्टेक्स ए७

स्नॅपड्रॅगन ४०० चिपसेट

एड्रिनो ३०५ जीपीयू

रॅमः एक जीबी

रिअर कॅमेराः ८ मेगापिक्सल

फ्रंट कॅमेराः २ मेगापिक्सल

इंटर्नल मेमरीः ८ जीबी

ऑपरेटिंग सिस्टीमः अॅण्ड्रॉइड किटकॅट ४.४.४

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Friday, August 22, 2014 - 18:13


comments powered by Disqus