लिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन

लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.

Updated: Aug 17, 2015, 08:18 PM IST
लिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन title=

मुंबई: लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.

या नव्या डिव्हाईसचा डिस्प्ले ट्रान्सपरंट आहे. याची बॅकबॉडी आपल्याला दिसणार नाही. चीनची एक वेबसाइट Weiboवर Z1च्या लॉन्च इव्हेंटमध्ये काही फोटो पोस्ट केले गेलेय. या फोटोत असा प्रोटोटाइप स्मार्टफोन दिसतोय. ज्याच्या स्क्रीनवर कोणतीही फ्रेम नाही आणि डिस्प्ले काचेसारखा पारदर्शी आहे. हा प्रोटोटाइप डिव्हाइस एका सामान्य स्मार्टफोनसारखा काम करतो. यावर फोटो दिसतात. कॉल केला जावू शकतो. म्यूझिक प्ले करण्याशिवाय या डिव्हाइसवरून खूप काम केले जावू शकतात. डिव्हाइस अँड्रॉइड सारख्या इंटरफेसवर काम करतो.

लिनोव्होचा हा फोन सॅमसंग, अॅपल, एलजीसह सर्व दिग्गज कंपन्यांना जबरदस्त टक्कर देईल. 

Zuk Z1चे खास फीचर्स -

- ५.५ इंचाचा संपूर्ण एचडी डिस्प्ले, 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशनसह
याच्या फ्रंट पॅनलवर होम बटन दिलं गेलंय. z1 स्मार्टफोनमध्ये असलेलं होम बटन फिंगरप्रिंट स्कॅनर सारखंही काम करेल.

- प्रोसेसर 2.5GHZ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ आहे. सोबतच ३जीबी रॅम आणि Adreno 330 GPU असेल.

- डिव्हाइसमध्ये नॅनो सिमकार्ड सपोर्ट करेल आणि अँड्रॉइड ५.१.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिमवर हा चालेल. याची इंटरनल मेमरी ६४जीबी आहे.

- स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा. कॅमेऱ्यात सोनीचं सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेन (OIS) आहे. हे फीचर साधारणपणे हाय-एंड स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतं. सोबतच ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा यात आहे.

- डिव्हाइसमध्ये ४१००mAhची दमदार बॅटरी आहे. हा फोन व्हाइट आणि ग्रे कलर व्हॅरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.