बारावीचा निकाल २७ मे रोजी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची  परीक्षा पार पडली होती. 

Updated: May 26, 2015, 10:42 PM IST
बारावीचा निकाल २७ मे रोजी title=

मुंबई: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची  परीक्षा पार पडली होती. 

बारावीचा निकाल २७ मे रोजी लागणार अशी माहिती, बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना निकाल mahresult.nic.in या साईटवर दुपारी १ वाजल्या पासून पाहता येणार आहे.

या वेबसाईटवर पाहा निकाल
 
www.mahresult.nic.in
 
www.maharashtraeducation.com

निकाल कसा पाहाल?
 
निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in  या वेबसाईटला भेट द्या. तेथे बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकाण्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

सर्व विद्यार्थ्यांना झी२४ तासतर्फे शुभेच्छा!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.