ग्राहकानं मागवला आयफोन, 'स्नॅपडील'नं पाठवली लाकडं!

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून तक्रारी वाढत चालल्यात. यामध्ये, आघाडी मिळवलीय ती भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'नं...

Updated: Dec 13, 2014, 10:58 AM IST
ग्राहकानं मागवला आयफोन, 'स्नॅपडील'नं पाठवली लाकडं! title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून तक्रारी वाढत चालल्यात. यामध्ये, आघाडी मिळवलीय ती भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'नं...

पुणे : काही दिवसांपूर्वी, एका ग्राहकाला दगडाचा तुकडा पाठवल्यानंतर आता 'फ्लिपकार्ट'नं चक्क एका ग्राहकाला लाकडाचे तुकडे पॅक करून पाठवलेत. यामुळे, या वेबसाईटच्या ग्राहकांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.  

पुण्याच्या दर्शन काबरा यांनी गेल्या ७ डिसेंबर रोजी या वेबसाईटवरून 'आयफोन ४ एस' हा स्मार्टफोन ऑर्डर केला होता. या ऑर्डरची डिलिव्हरी त्यांना ११ डिसेंबर रोजी मिळाले. यानंतर त्यांनी जेव्हा हा सीलपॅक केलेला बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यात आयफोनऐवजी लाकडाचे तुकडे त्यांना आढळले.

परंतु, काबरा यांनी या ऑर्डरसाठी 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा ऑप्शन निवडला होता. त्यामुळे, त्यांनी ऑर्डर चेक केल्यानंतर ताबडतोब डिलिव्हरी बॉयला पैसे देण्यास नकार दिला. काबरा यांनी ऑर्डर केलेल्या आयफोनची किंमत ४०,५०८ रुपये आहे.

अशा वाढत्या घटनांमुळेऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना चांगलाच धक्का बसलाय. सोबतच, रिटेलर्सलाही अशा चुकांची किंमत भोगावी लागू शकते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.