अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोफत

 सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील जगातील बलाढय़ कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने आपले लोकप्रिय 'वर्ड', 'एक्सेल' आणि 'पॉवरपॉइंट' अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मोफत दिली आहेत. याचा मोठा फायदा जगातील कोटय़वधी ग्राहकांना होणार आहे. त्याचबरोबर 'आऊटलूक' ई-मेल प्रोग्राम आता आयफोन आणि आयपॅडमध्ये देऊ केला आहे.

Updated: Jan 31, 2015, 08:10 PM IST
अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोफत title=

सिएटल :  सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील जगातील बलाढय़ कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने आपले लोकप्रिय 'वर्ड', 'एक्सेल' आणि 'पॉवरपॉइंट' अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅन्ड्रॉईड टॅब्लेटवर मोफत दिली आहेत. याचा मोठा फायदा जगातील कोटय़वधी ग्राहकांना होणार आहे. त्याचबरोबर 'आऊटलूक' ई-मेल प्रोग्राम आता आयफोन आणि आयपॅडमध्ये देऊ केला आहे.

अ‍ॅपल आणि गुगलच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट मागे पडत असल्याने मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टची लोकप्रिय उत्पादन अ‍ॅन्ड्रॉईडवर देण्याचे ठरवले आहे. अ‍ॅपलच्या लोकप्रिय आयओएस आणि गुगलच्या अ‍ॅन्ड्रॉईडवर मायक्रोसॉफ्टने 'ऑफिस ३६५' उपलब्ध केले आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा ७ डॉलर्स मोजावे लागणार आहेत.

गुगल प्लेअ‍ॅप स्टोअरवरून हे 'ऑफिस' अ‍ॅप ग्राहकांना डाऊनलोड करून घेता येऊ शकेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीची वर्ड, एक्सेल व पॉवरपॉइंट ही सर्वाधिक खपाची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. तसेच विंडो १० बरोबरच अत्यंत सोपी ऑफिसअ‍ॅप सादर करण्याचे मायक्रोसॉफ्टने ठरवले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.