पिता बनवल्यावर मिळणार ६ आठवड्यांची सुट्टी

ही बातमी वाचल्यानंतर काही जणांना आनंद तर काही लोकं नाराज होऊ शकतात. कारण जी लोकं मायक्रोसाफ्ट इंडियामध्ये काम करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण इतर लोकांसाठी ही नाराज करणारी बातमी आहे.

Updated: Apr 23, 2017, 12:50 PM IST
पिता बनवल्यावर मिळणार ६ आठवड्यांची सुट्टी title=

मुंबई : ही बातमी वाचल्यानंतर काही जणांना आनंद तर काही लोकं नाराज होऊ शकतात. कारण जी लोकं मायक्रोसाफ्ट इंडियामध्ये काम करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण इतर लोकांसाठी ही नाराज करणारी बातमी आहे.

मायक्रोसाफ्ट इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पिता बनल्यानंतर काही सवलती दिल्या आहेत. कंपनीने कुटुंबाची काळजीसाठी एक नवी सुट्टी सुरु केली आहे. मायक्रोसाफ्ट इंडियाने महिलांना गरोदर असतांना मिळणाऱ्या सुट्यांमध्ये वाढ केली आहे. महिलांना आता २६ आठवड्यांचटी सुट्टी मिळणार आहे. तर पिता झालेल्या पुरुषांना ६ आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे.

तसेच कुटुंबात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांच्या देखभालीसाठी ४ आठवड्यांची सुट्टी देखील कंपनी देणार आहे.