ग्राहक 'पोस्टपेड'चं जास्त बिल, कॉल डिस्कनेक्ट, नेटस्पीडने हैराण

'पोस्टपेड'च्या मोबाईल ग्राहकांना आपलं बिल जास्त येत असल्याचा अनुभव येत आहे. एक वर्षापूर्वी जर तुमचं पोस्टपेड बिल हजार रूपयांपर्यंत येत असेल, तर ते आता दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत येऊन पोहोचल्याचे ग्राहकांचे अनुभव आहेत.

Updated: Nov 24, 2015, 05:56 PM IST
ग्राहक  'पोस्टपेड'चं जास्त बिल, कॉल डिस्कनेक्ट, नेटस्पीडने हैराण title=

मुंबई : 'पोस्टपेड'च्या मोबाईल ग्राहकांना आपलं बिल जास्त येत असल्याचा अनुभव येत आहे. एक वर्षापूर्वी जर तुमचं पोस्टपेड बिल हजार रूपयांपर्यंत येत असेल, तर ते आता दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत येऊन पोहोचल्याचे ग्राहकांचे अनुभव आहेत.

यातही कॉलड्रॉप आणि नेटवर्कच्या अडचणींनी ग्राहक बेजार झाले आहेत, एका बाजूला कॉल डिस्कनेक्ट होतात. नेटवर्क नसल्याने स्पीडही मिळत नाही, मात्र भरमसाठी बिल येत असतं, ग्राहक संपर्क केंद्रावरून गोड भाषेचा मारा ग्राहकांवर होतोय.

यामुळे ग्राहकांनी पोस्टपेड प्रिपेड करण्याचंही प्रमाण वाढलं आहे, आपण प्रिपेड करू नका, ते खूप महागात जातं, अशी खोटी समजूत देखील ग्राहक संपर्क केंद्रावरून दिले जातात.

काही ग्राहकांना तर अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली जात आहेत, आपण एवढा वापर केला नाही हे सांगण्यात ग्राहकांच्या नाकी नऊ येतात, मात्र फोन कनेक्शन बंद नको, म्हणून इच्छा नसतानाही बिल भरावं लागण्याची काही उदाहरण आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.