भारतात मोटोरोलाने नोकियाला सोडलं मागे

Updated: Aug 4, 2014, 06:45 PM IST
भारतात मोटोरोलाने नोकियाला सोडलं मागे

भारतीय बाजारात अमेरिकन मोबाइलफोन उत्पादक मोटोरोलाने नोकिया (मायक्रोसॉफ्ट) ला मागे सोडलं आहे. मोबाइल फोन विक्रीचा रेकॉर्ड ठेवणारी कंपनी कॅनालिसने हा खुलासा केला आहे.

यावर्षाच्या पहिल्या तिमाहीत मिळालेल्या माहितीनुसार, मोटोरोलाने भारतात विक्रीसाठी 3,79,310 आणि दुसऱ्या तिमाहीत 9,55,650 हँडसेट पाठवले होते. तर नोकियाने 6,33,650 हँडसेट पाठवले होते. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टने नुकताच नोकियाला टेक ओवर केलं आहे.

सॅमसंग भारतात मोबाईल विक्रीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर त्यानंतर मायक्रोमॅक्स आणि कार्बन कंपनीचा क्रमांक लागतो.2014 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बाजारात स्मार्ट फोनची 9 टक्याने वाढ झाली. 
मोटोरोलाच्या मोटो-जी या हँडसेटची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात झाल्याने मोटोरोलाला भारतात चांगल यश मिळालं आहे. कंपनीने मोटो-एक्स व मोटो-ई भारतीय बाजारात उतरवल्या पासून त्याला ही भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.