व्हेलेंटाईन स्पेशल : मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची लव्हस्टोरी

व्हॅलेंटाइन डे म्हटलं की काही नावं लक्षात येतात. पण देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लव्ह लाईफ बाबत खूपच कमी लोकांना माहित असेल. 

Updated: Feb 12, 2016, 08:54 AM IST
व्हेलेंटाईन स्पेशल : मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची लव्हस्टोरी title=

मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हटलं की काही नावं लक्षात येतात. पण देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लव्ह लाईफ बाबत खूपच कमी लोकांना माहित असेल. 

मुकेश अंबानी यांची लव्ह स्टोरी देखील अनोखी आहे. एका कार्यक्रमात धिरूभाई अंबानी यांनी निता अंबानी यांना डान्स करतांना पाहिलं होतं. तेव्हाच त्यांना निता यांना आपल्या घरची सून बनवण्याचा विचार आला. 

धिरूभाई अंबानी यांनी निता अंबानी यांना फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. त्यानंतर त्या त्यांच्या वडीलांसोबत तेथे पोहोचल्या. धिरुभाई अंबानी यांनी त्यांच्या तु माझ्या मुलाला भेटशील का असं विचारलं आणि निता यांनी त्याचं उत्तर हो असं दिलं. 

६ ते ७ वेळा भेट झाल्यानंतरही निता अंबानी हे निर्णय घेऊ शकल्या नव्हत्या.  एक दिवस मुकेश अंबानी आणि निता अंबानी हे मुंबईच्या पेडर रोडवरून जात होते. त्यानंतर गाडी सिग्नला येऊन थांबली आणि मुकेश अंबानी यांनी फिल्मी स्टाईलमध्ये निता अंबानी यांना विचारलं की, 'तु माझ्या सोबत लग्न करशील का ?' यावर निता यांनी काहीच उत्तर दिलं नाही. सिग्नल ग्रीन झाला तर निता अंबानी यांनी त्यांना गाडी सुरू करण्यास सांगितली. पण मुकेश अंबानी यांनी म्हटलं की जोपर्यत तु उत्तर देत नाही तोपर्यंत गाडी नाही चालवणार. त्यानंतर निता अंबानी यांनी यस... आय विल असं उत्तर दिलं. त्यानंतर १९८४ मध्ये निता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा विवाह झाला.