५ BMW कारच्या किंमती पेक्षाही महाग आहे ही नेलपॉलिश

महिलांच्या गरजा किती असतात याचा अंदाजाही लावता येत नाही. एखाद्याचा छंद किती महाग असू शकतो याचा अंदाज देखील लावता येत नाही. खास करुन जेव्हा गोष्ट येते लिप्स्टीक आणि नेलपॉलिशची. काही दिवसांपूर्वीच एक नेलपॉलिश बाजारात आली आहे. ज्याची किंमत ५ बीएमडब्लू कारच्या किंमती एवढी आहे.

Updated: Jun 7, 2016, 06:11 PM IST
५ BMW कारच्या किंमती पेक्षाही महाग आहे ही नेलपॉलिश title=

मुंबई : महिलांच्या गरजा किती असतात याचा अंदाजाही लावता येत नाही. एखाद्याचा छंद किती महाग असू शकतो याचा अंदाज देखील लावता येत नाही. खास करुन जेव्हा गोष्ट येते लिप्स्टीक आणि नेलपॉलिशची. काही दिवसांपूर्वीच एक नेलपॉलिश बाजारात आली आहे. ज्याची किंमत ५ बीएमडब्लू कारच्या किंमती एवढी आहे.

ही नेलपॉलिश आतापर्यंत २५ महिलांनी खरेदी केली आहे आणि ५७६ लोकांनी याची बुकींग देखील केली आहे. या नेलपॉलिशची किंमत १ कोटी ६० लाख रुपये आहे. एजेसर ब्रँडची ही नेलपॉलिश आहे. ब्लॅक डायमंडच्या नावाने देखील ही नेलपॉलिश ओळखली जाते. या नेलपॉलिशची खासियत ही आहे की, यामध्ये २६७ कॅरेटचे ब्लॅक डायमंड आहेत.