चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती

जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 4, 2013, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
ही भरती नाशिक मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग नाशिक प्रादेशिक निवड समिती आणि नियंत्रक अधिकारी नाशिक जिल्हा अधीक्षक अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ, नाशिक यांच्यावतीने रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शिपाई, चौकीदार आणि कालवा चौकीदार या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. शिपाई पदासाठी किमान चौथी पास अट असून चौकीदारसाठी इयत्ता ४थी पास आणि एक वर्षाचा अनुभव तर कालवा चौकीदारसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि एक वर्ष कामाचा अनुभव असावा.
उमेदवारांच्या परीक्षा या नाशिक येथेच घेतल्या जाणार आहेत. शिपाई पदासाठी १२ जागा, चौकीदार पदासाठी चार तर कालवा चौकदार यासाठी एकूण ८ जागा रिक्त आहेत. यासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि अर्ज भरण्याबाबतची माहिती htpp://oasis.mkcl.org/wrdclass4 या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.