आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

Updated: May 7, 2017, 12:56 PM IST
आज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा title=

मुंबई : आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

देशभरात 56  हजार वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. २०१६  मध्ये ७ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. या परीक्षेला येताना हॉल तिकीटासोबत आधारकार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणि एक पासपोर्ट साइज फोटोदेखील ठेवावा असं आवाहन बोर्डानं केलं आहे.

परीक्षेसाठी ए आणि बी असे दोन गट करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना फुल स्लिव्हजचे कपडे तसेच गडद रंगाचे कपडे घलण्यास परवानगी नाही आहे.