आता मोबाईलवर इंटरनेट नसेल, तरी फेसबुक चालेल

फेसबुकने आपल्या मोबाईल धारकांसाठी एक नवा ऍप लॉन्च केला आहे. या ऍप अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, पण इंटरनेट नाही. सोशल वेबसाईट कंपनीने गुरूवारने जाम्बिया इंटरनेटडॉटआर्ग नावाचा ऍप लॉन्च केला

Updated: Aug 7, 2014, 06:31 PM IST
आता मोबाईलवर इंटरनेट नसेल, तरी फेसबुक चालेल title=

मुंबई : फेसबुकने आपल्या मोबाईल धारकांसाठी एक नवा ऍप लॉन्च केला आहे. या ऍप अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, पण इंटरनेट नाही. सोशल वेबसाईट कंपनीने गुरूवारने जाम्बिया इंटरनेटडॉटआर्ग नावाचा ऍप लॉन्च केला

इंटरनेट-तंत्रज्ञान
हा ऍप एअरटेलच्या ग्राहकांना फेसबुक आणि त्याच्या मॅसेंजरसह 13 इतर इंटरनेट सेवा निशुक्ल उपलब्ध करून देणार आहे. यात विकिपीडिया, गूगल सर्च, मान्सून, नोकरी आणि आरोग्य सेवेशी संबंधीत साईटचा समावेळ आहे.

यात मात्र ईमेलची सुविधा नसेल, तसेच गूगल सर्च केल्यानंतर पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला पैसे आकारले जातील. इंटरनेटडॉटआर्ग प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर गे रोजेन यांनी म्हटलंय, की हा ऍप एंड्रायडशिवाय साधारण फीचर असणाऱ्या फोनवरही चालणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.