निसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त

Last Updated: Friday, April 21, 2017 - 15:27
निसानची कार झाली २ लाखांनी स्वस्त

मुंबई : जपानची कार बनवणारी कंपनी निसानने त्यांच्या मध्यम श्रेणीच्या सेडान कार सनीची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने म्हटलं की, आता दिल्लीच्या शोरूममध्ये सनीची किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. जी 8.99 लाख रुपयांना ऑन रोड मिळेल.

पेट्रोल व्हर्जनची किंमत 1.01 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची नवी किंमत 6.99 लाख रुपये असणार आहे. सगळ्यात अॅडवान्स व्हर्जनची किंमत 1.99 लाख रुपयांनी कमी केल्यानंतर त्याची नवी किंमत 8.99 लाख रुपये असणार आहे.

डीजल व्हर्जनच्या मॉडलची किंमत 1.31 लाख रुपयांनी कमी केली आहे. त्याची नवी किंमत आता 7.49 लाख रुपये असणार आहे.

First Published: Friday, April 21, 2017 - 15:27
comments powered by Disqus