‘नोकिया’ संपला नाही, ‘टॅबलेट’ची धमाकेदार एन्ट्री!

‘मायक्रोसॉफ्ट’नं नोकियाचा हँन्डसेटवर ताबा मिळवल्यानंतर ‘नोकिया’ संपली असंच अनेकांना वाटलं होतं... पण, ‘नोकिया’ हे नाव अजूनही संपलेलं नाहीय, हे या कंपनीनं दाखवून दिलंय.

Updated: Nov 19, 2014, 08:23 PM IST
‘नोकिया’ संपला नाही, ‘टॅबलेट’ची धमाकेदार एन्ट्री! title=

नवी दिल्ली : ‘मायक्रोसॉफ्ट’नं नोकियाचा हँन्डसेटवर ताबा मिळवल्यानंतर ‘नोकिया’ संपली असंच अनेकांना वाटलं होतं... पण, ‘नोकिया’ हे नाव अजूनही संपलेलं नाहीय, हे या कंपनीनं दाखवून दिलंय.

आपला सगळा कारभार आणि हँडसेट मायक्रोसॉफ्टला विकल्यानंतर एक वर्षभरात नोकियाने ‘तैवान’ची कंपनी ‘फाक्सकॉन’सोबत एकत्र येऊन नवा टॅबलेट ‘एन १’ लाँच केला आहे. पुन्हा एकदा नोकियाने टॅबलेट लाँच करून मोबाईल उपकरण क्षेत्रात पदार्पण केले आहे.
याच वर्षाच्या सुरुवातीला नोकिया कंपनीने आपला मोबाईल उपकरणाचा कारभार मायक्रोसॉफ्टला ७.२ अरब डॉलरमध्ये विकला होता. त्यानंतर नोकियाचा हा अँन्ड्रॉईड टॅबलेट ‘एन १ लॉलीपॉप’वर आधारित आहे.
अॅपल आयफोन बनवणारी फाक्सकॉन कंपनी याचे विक्री तसेच ग्राहक सेवांचा संपूर्ण कारभार हाताळणार आहेत. नोकिया टॅबलेट ‘एन १’ हा प्रथम चीनमध्ये २४९ डॉलर्सना (जवळपास १५४०० रुपये) १९ फेब्रुवारी २०१५ पर्यंत उपलब्ध होईल. नोकिया टेक्नोलॉजीचे प्रमुख उत्पादक सेबेस्टियन नाईस्ट्राम यांनी नोकियाच्या या नव्या वाटचालीवर आनंद व्यक्त केलाय.  

‘नोकिया एन १’ टॅबलेटची वैशिष्ट्ये...
* रिअर कॅमेरा : ८ मेगापिक्सल
* फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल
* इंटरनल स्टोअरेज : ३२ जीबी
* स्टिरिओ स्पीकर्स : ०.५ वॉटचे २ स्पिकर्स
* बॅटरी : ५३०० मेगाहर्टझ्
* डिस्प्ले : २०४८ X १५३६ पिक्सल, ७,९ इंचाचा डिस्प्ले (कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चा वापर)
* प्रोसेसर : २३ गिगाहर्टझ ६४ बिट इंटेल ऐटम Z3580
* रॅम : २ जीबी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.