RBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 117 जागा भरणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 23 जून 2014 अखेरची तारीख आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 10, 2014, 01:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 117 जागा भरणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 23 जून 2014 अखेरची तारीख आहे.
पात्रता
 ग्रेड बी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणं गरजेचं आहे. तसंच ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक आहे. किंवा अर्जदारानं 55% अंकांनी पोस्ट ग्रॅज्युएट असावं. किंवा 50 टक्के गुणांनी
पीएचडी किंवा मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एमबीएची डिग्री.
 अर्जदाराचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असावं. वय 1 जून 2014 पासून मोजलं जाईल.
 SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची सूट देण्यात आलीय.

पगार आणि निवडीची पद्धत
ग्रेड बी ऑफिसर पदासाठी पगार 21,000 ते 36,400 रुपये ठरवण्यात आलाय. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीला बोलवलं जाईल.
अर्ज करण्याची पद्धत
 इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. तर अर्जाची फी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून भरता येवू शकते.
 ऑनलाईन फी भरायची 23 जून अखेरची तारीख
अधिक माहितीसाठी आरबीआयची वेबसाईट http://www.rbi.org.in/ वर लॉग इन करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.