१४८ रुपयांत ७० जीबी इंटनेट डेटा

अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स नवा प्लान लाँच करण्याच्या तयारीत आहे. वेबसाईट टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी १४८ रुपयांच्या रिचार्जवर तब्बल ७० जीबी डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे.

Updated: May 2, 2017, 10:24 AM IST
१४८ रुपयांत ७० जीबी इंटनेट डेटा title=

नवी दिल्ली : अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स नवा प्लान लाँच करण्याच्या तयारीत आहे. वेबसाईट टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी १४८ रुपयांच्या रिचार्जवर तब्बल ७० जीबी डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे.

म्हणजेच यूजर्सला दिवसाला एक जीबी डेटा वापरता येणार आहे. कंपनीने यसोबतच आणखी काही प्लान लाँच केलेत. यात ५४ आणि ६१ रुपयांच्या प्लान्सचाही समावेश आहे. 

५४ रुपयांच्या रिचार्जवर २८ दिवसांसाठी दिवसाला एक जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. या रिलायन्स टू रिलायन्स कॉलिंगसाठी १० पैसे प्रति मिनिट तर एसटीडी कॉलिंगचा दर २५ पैसे प्रति मिनिट आहे. तर ६१ रुपयांच्या प्लानमध्येही दिवसाला १ जीबी डेटा यूजर्सना मिळणार आहे.

विशेष म्हणजे हे सर्व रिचार्ज एफआरसी आहेत म्हणजेच नवीन सिम घेतल्यावर पहिल्यांदा रिचार्ज केल्यास तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी आहे.