खुशखबर ! डीआरडीओ मध्ये नोकरीची संधी

संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टेंट या पदासाठी ५६४ जागांसाठी, टेक्निशिअन या पदासाठी ३४५ आणि इतर जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 

Updated: Feb 1, 2016, 04:09 PM IST
खुशखबर ! डीआरडीओ मध्ये नोकरीची संधी title=

जयपूर : संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO मध्ये सीनियर टेक्निकल असिस्टेंट या पदासाठी ५६४ जागांसाठी, टेक्निशिअन या पदासाठी ३४५ आणि इतर जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. 

एकूण ११४२ जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी किमान वय १८ ते ३० असणं गरजेचं आहे. १० वी, १२ वी आणि बीएसई ही वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची पात्रता असणार आहे. DRDO च्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता. 

८ फेब्रुवारी २०१६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.