संरक्षण मंत्रालयात १८१ जागांसाठी भरती

संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 29, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा उपलब्ध आहेत. याबाबत एम्प्लाँयमेंट न्यूजच्या १२ ते१८ ऑक्टोबर २०१३ च्या अकांत जहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कुशल कामगारांसाठी अर्जदार हा शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. त्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, मशिनीस्ट, ओपीटी वर्कर, एक्झामिनर टर्नर, मिलराईट आदी पात्रता पूर्ण केलेली असावी.
विहीत नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रासह असणारे अर्ज द सीनिअर जनरल मँनेजर, आँटो इलेक्ट्राँनीक्स फँक्टरी, रायपूर- देहराडून, २४८००८ या पत्यावर पावठवावेत. अर्ज पाठविण्याची तारीख ५ नोव्हेबर २०१३ आहे. या पदासाठी ३२ वर्षांपर्यंत वयाची अट आहे.
आयुध निर्माण
या पदासाठी उमेदवार हा १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्यांने इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द मिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. त्याला संगणकाचे ज्ञान आवश्यक असावे.
या पदासाठी किमान वयोमर्यादा २५ वर्षे आहे. अधिक माहिती एम्प्लाँयमेंट न्यूजच्या १२ ते १८ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात मिळलेल. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहीत नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह अर्ज कमांडंट ऑर्डनन्स डेपो, शकुरबत्ती, दिल्ली ११०००५६ या पत्यावर पाठवण्यात यावेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेबर २०१३ आहे.
नोकरी विषय अधिक माहितीसाठी - www.governmentjobsnews.in वर संपर्क साधा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.