रोल्स रॉईस... भारतातील कचरा उचलणारी गाडी!

आजकाल एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या रोल्स रॉईल्स गाड्या भारतात एकेकाळी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या... आश्चर्य वाटलं ना... होय, पण हे खरं आहे...

Updated: Dec 9, 2013, 07:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजकाल एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या रोल्स रॉईल्स गाड्या भारतात एकेकाळी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या... आश्चर्य वाटलं ना... होय, पण हे खरं आहे...
भारतातील अलवर संस्थानाचे राजे महाराजा जयसिंह हे ब्रिटनमध्ये वास्तव्यास होते त्यावेळी त्यांचे लक्ष लंडनमधील बॉन्ड रस्त्यावरील रोल्स रॉईस कारच्या भव्य शोरुमकडे गेले. त्यांनी त्या शोरुममध्ये जाऊन चौकशी केली. इंग्रज मॅनेजरने इंडियन असल्यामुळे त्यांना ‘गेट आऊट’ असं म्हणून अपमानित केलं.
अपमानित महाराजा जयसिंह आपल्या हॉटेलमध्ये परत आले. तेथून त्यांनी रोल्स रॉईसच्या त्यांच शोरुममध्ये फोन लाऊन सांगितले की अलवरचे महाराज काही कार खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली. काही वेळानंतर महाराज खास राजेशाही पोशाखात सर्व नोकरचाकर घेऊन त्या शोरुमध्ये हजर झाले. त्या वेळी त्याचे रेड कार्पेट टाकून ‘वेलकम’ या शब्दात स्वागत करण्यात आले. तेव्हा तोच इंग्रज मॅनेजर व सर्व स्टाफ आता महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांचे अभिवादन करत होता. महाराजांनी त्यावेळी शोरुममध्ये असलेल्या सर्व कार खरेदी करुन त्यांची किंमत आणि भारतापर्यंतच्या वाहतुकीचा खर्च देऊ केला.
भारतात आल्यानंतर महाराज जयसिंहानी या सहाच्या सहा कार अलवर नगरपालिकेला भेट दिल्या आणि आदेश दिला की रोजच्या कचरा वाहतुकीसाठी या कार वापरल्या जाव्यात. जगातील अव्वल नंबरची मानल्या जाणाऱ्या या सुपरक्लास रोल्स रॉईस कारचा वापर कचरा वाहतुकीसाठी हात असल्याची महिती वणव्यासारखी सर्व जगभर पसरली. त्यावेळी इंग्लंड, अमेरिकेतील एखादी व्यक्ती माझ्याकडे रोल्स रॉईस कार आहे, असं अभिमानाने सांगू लागला तर समोरचा लगेच बोलत असे की, तीच ना जी भारतात कचरा वाहतुकीसाठी वापरली जाते. या बदनामीमुळे ‘रोल्स रॉईस’ कारची जगभरातील विक्री प्रचंड मंदावली त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला.
रोल्स रॉईस कंपनीने त्वरीत महाराजा जयसिंह यांना तार पाठवून लेखी माफी मागितली. या माफीपत्रात कंपनीने लिहीलं होतं की, ‘आता तरी आमच्या कार कचरा वाहतुकीसाठी वापरणे थांबवा’. महाराज जयसिंहाना, कंपनीला चांगलाच धडा मिळाला आहे, याची खात्री पटली तेव्हा त्यांनी या कारचा वापर कचरा वाहतुकीसाठी थांबवला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.