सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Updated: Sep 24, 2016, 10:18 PM IST
सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 लॉन्च  title=

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी ऑन 7 हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनला 2GHz ऑक्टा कोर प्रोसेसर असून 5.5 इंचाची एचडी स्क्रीन आहे. सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 GB RAM आहे.

या स्मार्टफोनमध्ये 32 GB इंटरनल मेमरी आहे, तर 256 GB पर्यंत ही मेमरी वाढवता येऊ शकणार आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रीयर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

167 ग्रॅम वजन असलेला या स्मार्टफोनला ऍण्ड्रॉईड मार्शमेलो व्हर्जन असून फोनची बॅटरी 3,300 mAh एवढी आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर या मोबाईलची किंमत 16 हजार रुपये एवढी आहे.