सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.

Updated: Apr 20, 2017, 07:12 PM IST
सॅमसंग गॅलेक्सी एस-8 आणि प्लस भारतात लॉन्च

मुंबई : सॅमसंगनं गॅलेक्सी एस-8 आणि गॅलेक्सी एस-8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. यातल्या गॅलेक्सी एस-8 ची किंमत ५७ हजार ९०० रुपये तर एस-8 प्लसची किंमत ६४ हजार ९०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. सॅमसंगचे हे दोन्ही फोन ठराविक शोरूम आणि फ्लिपकार्टवर ५ मेपासून मिळणार आहेत. या फोनच्या प्री-बूकिंगला सुरुवात झाली आहे.

हा स्मार्टफोन विकत घेणाऱ्यांसाठी रिलायन्स जिओकडून डबल डेटा मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ३०९ रुपयांच्या मासिक रिचार्जवर ८ महिन्यांपर्यंत ४४८ जीबी 4G डेटा मिळेल.

गॅलेक्सी एस-8 ची फिचर्स

डिस्प्ले- 5.80 इंच

प्रोसेसर- 1.9GHz ऑक्टा कोअर

फ्रंट कॅमरा- 8 मेगापिक्सल

रॅम- 4GB

स्टोरेज- 64GB

रेअर कॅमेरा- 12 मेगापिक्सल

गॅलेक्सी एस-8 प्लसची फिचर्स

डिस्प्ले- 6.20 इंच

प्रोसेसर- 1.9GHz ऑक्टा कोअर

फ्रंट कॅमरा- 8 मेगापिक्सल

रॅम- 4GB

स्टोरेज- 64GB

रेअर कॅमेरा- 12 मेगापिक्सल