सॅमसंगने लॉन्च केले दोन बजेटचे ४जी स्मार्टफोन

कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आज '४जी' स्मार्टफोन बाजारात आणले. यातील 'गॅलेक्सी जे५' ची किंमत ११९९९ रुपये आहे तर 'गॅलेक्सी जे७' ची किंमत १४९९९ रुपयांपर्यत आहे.

Updated: Jul 17, 2015, 01:42 PM IST
सॅमसंगने लॉन्च केले दोन बजेटचे ४जी स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आज '४जी' स्मार्टफोन बाजारात आणले. यातील 'गॅलेक्सी जे५' ची किंमत ११९९९ रुपये आहे तर 'गॅलेक्सी जे७' ची किंमत १४९९९ रुपयांपर्यत आहे.

देशातून होणारी स्मार्टफोनची जास्त मागणी लक्षात घेता सॅमसंगने हे नवीन दोन वेगवेगळ्या बजेटचे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.
गॅलेक्सी जे५ याचा डिसप्ले ५ इंच आहे तर १.२ चा क्वाडकोर प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १३ मेगापिक्सल कॅमेरा आहे.
याचप्रकारे गॅलेक्सी जे७ याचा ५.५ इंच डिसप्ले आहे तर १.५ ऑक्टाकोर प्रोसेसर, १६ जीबी रॅम आणि १० मेगापिक्सल कॅमेरा आहे. 
सध्या आमच्याकडे १० एलटीई (४जी) स्मार्टफोन्स होते. आज आम्ही दोन नवीन मोबाईल बाजारात आणत आहोत. पुढे जाऊन अजून स्मार्टफोन्स बाजारात आणायचा आमचा मानस आहे. असे वक्तव्य सॅमसंगन कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष असीम वारसी यांनी केले आहे.
सॅमसंगच्या ४जी स्मार्टफोनच्या हॅंडसेटची किंमत ९००० रुपयांपासून ते ६०००० रुपयांपर्यत आहे. 
हे दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट द्वारे विकणार आहेत तर २२ जुलैपर्यंत यांची प्रीबुकींग करणार आहेत.
४जी च्या सेवेसाठी सॅमसंगने ए्अरटेल या कंपनीशी भागीदारी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.