सॅमसंगच्या गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत भरपूर कपात

कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं आपल्या ड्युअल सिम हँडसेट गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत कपात केलीय. हा फोन 12,000 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. आता त्याची किंमत 4,000 रुपयांनी कमी झालीय. सॅमसंगच्या वेबसाइटवर याची किंमत कमी होऊन 8,007 रुपये झालीय. 

Updated: Sep 18, 2014, 08:53 PM IST
सॅमसंगच्या गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत भरपूर कपात title=

नवी दिल्ली: कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं आपल्या ड्युअल सिम हँडसेट गॅलॅक्सी कोर-2च्या किमतीत कपात केलीय. हा फोन 12,000 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. आता त्याची किंमत 4,000 रुपयांनी कमी झालीय. सॅमसंगच्या वेबसाइटवर याची किंमत कमी होऊन 8,007 रुपये झालीय. 

हा फोन 1.2 जीएचझेड क्वॉड कोर प्रोसेसर असलेलं आणि अँड्रॉइड 4.4.2वर आधारीत आहे. या ड्युअल सिम हँडसेटचं स्क्रीन 4.5 इंचीचा आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 800X480 पिक्सेल आहे. याची रॅम 768 एमबी आहे आणि इंटरनल स्टोरेज 4 जीबी आहे. त्याचं मायक्रो एसडी कार्ड 64 जीबी सपोर्ट करतो. 

रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सेल आहे तर फ्रंट कॅमेरा व्हीजीए आहे. याचं वजन 138 ग्राम आहे आणि जाडी 9.8 मिमी आहे. यात वाय-फाय, ब्लू-टूथ, जीपीएस फीचर्स आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.