नोकरीच्या शोधात आहात, रिक्त ५२ जागांवर भरती

जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदासाठी १ , एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा अशा ५२ जागा भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे.

Updated: Dec 20, 2014, 04:26 PM IST
नोकरीच्या शोधात आहात, रिक्त ५२ जागांवर भरती title=

मुंबई : जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदासाठी १ , एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा अशा ५२ जागा भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे.

जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदाची जागा
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०१४ आहे.
अधिक माहितीसाठी https://www.jnport.gov.in/Careers.aspx लॉगऑन करा.

एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा
एमपीएससी तर्फे उच्च व तंत्रशिक्षण, वित्त, उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागांतर्फे विभाग प्रमुख - विद्युत अभियांत्रिकी (१७ जागा), विभाग प्रमुख - ड्रेस डिझाईनिंग अॅण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग (६), विभाग प्रमुख - मुद्रणतंत्रशास्त्र (७), आधिव्याख्याता - औषधनिमार्णशास्त्र (६), विमा संचालक (१), भूवैज्ञानिक (६) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
अंतिम तारीख २४ डिसेंबर २०१४ आहे.
अधिक माहिती www.mpsc.gov.in येथे मिळेल.

पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा
पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी गट-ब (२ जागा) व विधी अधिकारी (६) कंत्राट पद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०१४ आहे.
अधिक माहिती www.thanepolice.org या संकेतस्थळावर मिळेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.