सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात !

अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे. 

Updated: Jul 26, 2014, 09:32 PM IST
सोहा अली खान आणि कुणाल खेमू बंधनात ! title=

मुंबई: अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले आहेत. पॅरिस मध्ये यांचा साखरपुडा पार पडला. दोघेही बऱ्य़ाच दिवसापासून रिलेशनशिप मध्ये होते. याच संबधाला दोघांनी अलीकडेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहाने तिच्या चाहत्यांना ट्विटरवर याची माहीती दिली आहे. 

ट्विटरवर तिने म्हंटल आहे "मला तुम्हाला सांगायला आनंद होतं आहे की कुणाल ने पॅरिस मध्ये जगातील सर्वात दुर्मिळ रिंग सोबत मला प्रपोस केलं आणि मी हो म्हटलं, सोहा अली खानची आई शर्मिला टागोर आणि भाऊ सैफ दोघांनाही हे नातं मान्य होतं. कुणाल खेमूचे वडील रवी खेमू यांनी अलीकडील मुलाखतीत म्हंटल होतं की जेव्हाही दोघांना लग्न करायचे असेल तेव्हा माझा आशीर्वाद त्यांच्या सोबत असेल. दोघांनीही 2009 मध्ये आलेल्या चित्रपट "99" मध्ये एकत्र काम केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.