सोनीचा सेल्फी फोन, प्रथमच फ्रन्ट कॅमेरासह फ्लॅश

सेल्फीच्या चाहत्यांना एक चांगलीच खूश खबर आहे. सोनी कंपनीने सर्वांपेक्षा चांगला असा फ्रंन्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

Updated: Jul 9, 2014, 02:19 PM IST
सोनीचा सेल्फी फोन, प्रथमच फ्रन्ट कॅमेरासह फ्लॅश  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : सेल्फीच्या चाहत्यांना एक चांगलीच खूश खबर आहे. सोनी कंपनीने सर्वांपेक्षा चांगला असा फ्रंन्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 

एक दिवस आधीच कंपनीने सोशल मीडियावरील सगळ्याच अकांऊन्टसवर फोनचे टिझर सादर केलेत. सोनी Experia c3 प्रो-सेल्फी नावाचा हा फोन पुढच्या महिन्यात चीनमध्ये विक्रीस सुरु होईल आणि त्यानंतर ग्लोबल मार्केटसमध्ये उपलब्ध होईल.

सर्वात पॉवरफुल कॅमेरा

कंपनीच्या मते हा जगातील सर्वात बेस्ट सेल्फी कॅमरा फोन आहे. या सेल्फी फोनमध्ये 5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमरा आहे. तसं तर बाजारात 5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देणारे खूप स्मार्टफोन आहेत. मात्र सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सोनीने c3 ला वेगळया प्रकारे डिझाईन केलेय म्हणजे याचा फ्रन्ट कॅमेऱ्याला फ्लॅश आहे. 

कॅमेराची अॅंगल 25मीमी आहे. जास्त कॅमेरा अॅंगल आणि सॉफ्ट LED फ्लॅश लाईट असल्याने कोणत्या प्रकारच्या लाईटमध्ये चांगला सेल्फी फोटो काढला जाऊ शकतो. 

सेल्फी कॅमेऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फोन डबल टॅप क्लिक, स्माईल शटर हे देखील फिचर्स फोनमध्ये आहेत. टेक साईट cnetमुळे स्माईल शटर फिचर ऑन केल्याने फोन यूजर्सच्या चेहऱ्याला फोकस करुन आपोआप फोटो क्लिक होतो. मात्र त्यावेळी यूजर्सना हसणे आवश्यक आहे. 

सोनी कंपनीने हा स्मार्टफोन खासकरुन फक्त सेल्फी चाहते लक्षात घेऊन फ्रन्ट कॅमेऱ्याला फोकस केलेय. 5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आणि फ्लॅशसोबत रियर कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे. या रियर कॅमेऱ्यासोबत फ्लॅशही आहे. 
 
तसेच हा सेल्फी फोन फ्रन्ट फेसिंग कॅमेरा वाईड अॅंगल सेल्फी फिचर ही देतो. या फिचरमुळे फोटोमध्ये एका वेळेस अनेक लोक एकत्र फोटोही काढू शकतात. फ्रन्ट आणि रियर कॅमेरामध्ये सुपिरियर ऑटो, पोर्ट्रेट, रिटच, टाईमशिफ्ट बर्स्ट, काही प्रकारचे पिक्चर इफेक्ट, मुव्ही क्रिएटर, सोशल लाईव्ह, स्वीप पॅनोरोमा आणि काही खास कॅमेरा अॅपसचा वापर करु शकतो. 

डिस्प्ले आणि पॉवर फिचर्स 

सोनीचा नवा एक्सपिरिया c3 स्मार्टफोन ५.५ इंच असून कॅपेसिटीव्ह टच स्क्रिन आहे. ७२०* १२८० पिक्सल रेझोल्यूशनसोबत या फोनमध्ये ट्रिलिम्युनिअस डिस्प्ले स्क्रिन आहे. तसेच ब्राव्हिया इंजिन २ टेक्निकने काम करते. हे टेक्निक सोनी ब्राव्हिया टीव्हीवर ही  पाहू शकता. एक्सपिरीया c3ची किंमत किती असेल किंवा या स्मार्टफोन भारतात कधीपर्यंत लाँच होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
 
सोनीचा हा फोन अॅन्ड्रॉईड किटकॅट ४.४ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. १.२GHzच्या क्वॉड कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसोबत १ GB रॅम दिली आहे. २५००mah च्या बॅटरी सोबत कंपनीच्या माहितीनुसार २४ तास टॉकटाईम देतो. तसेच १०७१ तासांचे स्टॅडबाय टाईम दिला गेला आहे. ८ जीबी इंटरनल मेमरीसोबत १५० ग्राम वजनाचा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.