'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वर 200 कोटी; ट्वीटरवर 'टॅव टॅव'

नर्मदाकाठी सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारला जाणार आहे.

Updated: Jul 10, 2014, 06:25 PM IST
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'वर 200 कोटी; ट्वीटरवर 'टॅव टॅव' title=

मुंबई : नर्मदाकाठी सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारला जाणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये यासाठी 200 कोटी रूपयांची तरतूद करण्याची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली.

मात्र यानंतर ट्वीटरवर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

पाहा काही निवडक प्रतिक्रिया

क्वीन बी ‏@vaidehisachin
असं वाटतंय नर्मदा काठावरील जगातील सर्वात मोठी प्रतिमा उभारण्यासाठी लोखंड (धातू) जमा करण्याचं अभियानं फु्स्स झालं आहे.

अमित दुबे ‏@_darksilence
लखनौच्या मेट्रोसाठी फक्त 100 कोटी आणि स्टेच्यू ऑफ युनिटीसाठी 200 कोटी, विकासाकडे आणखी एक पाऊल

नरेश वट्टेम ‏@Naresh455
सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे पर्यटन वाढेल, आणि कमाईही वाढेल, जशी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमुळे होते, त्यामुळे चिंता नको

सुहैल एस ‏@anjuminated
अर्थमंत्री तोट्यावर बोलतायत, आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 200 कोटी रूपये खर्च होतायत, यातून काय तर्क काढायचा?

रुचिका ‏@ruchikaakihur
स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 200 कोटी रूपये खर्च होतायत, असं वाटतंय हा मायावती बजेट आहे.

तारिक़ ख़ान ‏@Itariquekhan
स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 200 कोटी रूपये खर्च? वल्लभ भाई यांच्या जास्त सन्मान झाला, असता जर हा निधी तुम्ही तो विकासाच्या कामासाठी वापरला असता.

अंशुल विजयवर्गीय ‏@Anshulv
स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 200 कोटी आणि महिला सुरक्षेवर 150 कोटी !

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.