' 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'' आणि अभिनेत्री कल्कीचं 'स्टॉप जजिंग'

कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, यावरच सर्व अवलंबून असतं का?, यावरूनच तुम्ही ठरवणार आहात का?, तो किंवा ती कशी आहे, या वर अभिनेत्री कल्की कोचलनने एक व्हिडीओ बनवला आहे.

Updated: Apr 20, 2015, 10:18 AM IST
 ' 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'' आणि अभिनेत्री कल्कीचं 'स्टॉप जजिंग' title=

मुंबई : कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, यावरच सर्व अवलंबून असतं का?, यावरूनच तुम्ही ठरवणार आहात का?,तो किंवा ती कशी आहे, या वर अभिनेत्री कल्की कोचलनने एक व्हिडीओ बनवला आहे.

दीपिकाच्या माय चॉईस नंतर हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा एक दृष्टीकोन नक्की बदलेल किंवा सुधारणार आहे.

किंवा तो आधीपासूनच तुमच्याकडे असेल तर त्याचं समाधानही तुम्हाला जरूर असेल. खरं तर हा   'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'' या चित्रपटाचं प्रमोशनल व्हिडीओ आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.

सोनाली बोस दिग्दर्शित, कल्की कोचलीन अभिनित 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' हा सिनेमा आहे. सेलेब्रल पाल्सी नावाच्या एका आजारानं ग्रस्त असलेल्या लैला या मुलीची ही गोष्ट. 

पाहा - स्टाप जजिंग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.