तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

Updated: Jul 30, 2016, 11:09 AM IST
तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल... title=

मुंबई : अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

पण, खरंच तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतोय का? ही गोष्ट ओळखणं काही सोपी गोष्ट नाही. कारण, उघडपणे फार कमी जण आपली चूक कबूल करतात. तरीदेखील काही गोष्टींवर लक्ष ठेवून तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करतोय का? हे जाणून घेऊ शकतात.

भावनिकदृष्ट्या नातं तुटणं

तुमची पत्नी तुमची काळजी करत नाही, तुमच्या भावनांशी ती स्वत:ला जोडू शकत नसेल... तर तुमच्या नात्यातला प्रेमाचा धागा हरवलाय हे तुम्ही ओळखलंच असेल. असं असेल तर वेळीच सावध व्हा... आणि आपल्या जोडीदाराशी मोकळेपणानं संवाद साधा... त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

अनेक गोष्टी लपवणं...

छोट्या छोट्या गोष्टी आपल्या साथीदारासोबत शेअर करणं... आणि या छोट्या छोट्या गोष्टींतही मनमुराद आनंद घेणं... हा तर कोणत्याही नात्याचा पाया असतो... पण, तुमची पत्नी तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवत नसेल किंवा त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं तिला महत्त्वाचं वाटत नसेल... तर कदाचित या गोष्टी शेअर करण्यासाठी ती दुसऱ्या कुणाशी तरी शेअर करत असेल. 

लव्ह मेकिंगची मजा हरवणं

वारंवार शारीरिक संबंधांना नकार देणं, यामागे दुसऱ्याही काही गोष्टी कारणीभूत असू शकतात... परंतु, शारीरिक संबंधच म्हणजे नातं नसतं... आपल्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर केवळ हात फिरवून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. ही मजाच जर तुम्ही हरवली असेल तर आपल्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करा. 

एकांतात वेळ व्यतीत करणं

आपल्या जोडीदाराशिवाय एकांतात वेळ व्यतीत करणं... किंवा आपल्यातच मग्न राहणं हा देखील नात्यात अंतर आल्याचे संकेत असू शकतात.

वारंवार भांडत राहणं

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कानामागे टाकणं किंवा वारंवार भांडत राहणं... या गोष्टीदेखील संकेत ठरू शकतात.

अर्थात... असे संकेत तुम्हाला मिळाले तर कदाचित तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... पण, हे प्रत्येक वेळेस खरं ठरेल असं नाही... तुमच्या नात्याला योग्य वेळ देऊन तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकाल.