फेसबूक अॅप वापरताना ही काळजी जरुर घ्या

मुंबई : आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या फोनवर फेसबूक अॅप वापरतो.

Updated: Mar 5, 2016, 01:58 PM IST
फेसबूक अॅप वापरताना ही काळजी जरुर घ्या title=

मुंबई : आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या फोनवर फेसबूक अॅप वापरतो. पण, हे करताना आपण आपल्या माहितीच्या सुरक्षेचा विचार करत नाही. यातील आपली काही माहिती सुरक्षित ठेवणे फार गरजेचे आहे. या काही टिप्स तुमच्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे.



...असं करा तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित!

- फेसबूक वापरताना आपण टाकलेल्या पोस्ट्स किंवा फोटोज पाहतंय याची तुम्हाला कल्पना नसते. पण, हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न तरी केला आहे का? आपण अनेकदा असे फोटो टाकतो किंवा पोस्ट अपलोड करतो जे आपल्याला खरं तर आपल्या काही मित्र मैत्रिणींमध्येच ठेवायचे असतात. तुमच्या सिक्युरिटी सेटिंग्जच्या माध्यमातून हे करणं शक्य आहे. त्याचा वापर करत जा.

- सुरक्षा सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या पोस्ट्स कोण पाहतंय हे पाहून त्यावर अंकुश ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचा ई-मेल आयडी किंवा तुमची इतर खाजगी माहिती कोणाच्या हाती पडू नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.



- फेसबूक अॅप वापरताना आपण आपला फेसबूक अकाऊंट अनेकदा इतर वेब साईट्ससोबत कनेक्ट करतो. हे करताना त्या वेबसाईट्स तुमच्या फेसबूक प्रोफाईलवरील माहिती वापरण्याची परवानगी मागतात. तेव्हा ही माहिती देताना आपण कोणकोणती माहिती उघड करतोय, याची एकदा खात्री करुन घ्या. अॅप वापरताना सिक्युरिटी टूलच्या माध्यमातून कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही याचे पर्याय स्वीकारा.



- जर तुम्ही फेसबूक अॅप वापरत असाल तर त्याच्या सेटिंग्जमध्ये जा. तुम्ही तुमचा अकाऊंट इतर कोणत्या अॅपशी कनेक्ट केलाय याची माहिती तुम्हाला मिळेल. जी अॅप्स तुम्ही आता वापरत नाहीत त्या अॅपसोबत कनेक्टेड असलेला अकाऊंट लगेचच अनकनेक्ट करा. यामुळे उगाच तुमची माहिती सर्वत्र उघड राहणार नाही.